मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाआधी त्यांची लव्हस्टोरी गुपित ठेवली होती, पण लग्नानंतर त्यांचा पीडीए (पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन) लोकांना पाहायला मिळत आहे. कॅटरिना कैफ आणि विकी नुकतेच इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा रोमँटिक अंदाजात दिसले. कॅट आणि विकीने एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोघांचा ‘समर कुल’ अंदाज दिसून येत आहे.
इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये विकी आणि कतरिना स्टायलिश गॉगल्समध्ये दिसत आहेत. विकी पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे, तर कॅटने सनग्लासेसमध्ये दिसत आहे.
कॅट आणि विकीने गेल्या वर्षी ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये लग्न केले होते. मात्र, या लग्नात फक्त कुटुंबातील लोक आणि जवळचे मित्र सामील होते. लग्नानंतर कॅट आणि विकी मालदीवमध्ये हनीमून साजरा करताना दिसले होते.
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर लग्नानंतर दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. कॅटने तिच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात कॅट विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. याशिवाय कॅट सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्येही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनीही दिल्लीत त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.