मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या कथित अफेअरच्या बातम्या सतत येत असतात. दोघांनी लवकरच लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांकडून इच्छा देखील व्यक्त केली जाते. या अफेरच्या बातम्यांवर सबा किंव्हा हृतिक यांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, नुकतंच हे कपल एरपोर्टवर एकमेकांच्या हातात हात घालून स्पॉट झाले आहेत.

अलीकडेच, चित्रपट स्टार हृतिक रोशन त्याच्या कथित गर्लफ्रेंड सबा आझादसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. जिथे दोघे एकमेकांचा हात धरून चालत होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी हृतिक रोशनला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तर हृतिक रोशनच्या जुन्या अफेअर्सवर कमेंट करत जुन्या यादया ओपन केल्या आहेत.

दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हृतिक रोशन लवकरच दीपिका पदुकोणसोबत ‘फाइटर’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो सैफ अली खानसोबत ‘विक्रम वेधा’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक समोर आला असून खूप व्हायरल होत आहे.