Loan : नवीन गाडी (Car Loan)खरेदीसाठी अनेकदा लोन घेतले जाते. मात्र यासाठी कार लोन की वैयक्तिक लोन नक्की कोणतं लोन घेणं राहत जास्त फायद्याचं, जाणून घ्या कार लोन आणि वैयक्तिक लोनचे फायदे (Benefits) आणि तोटे. (Side Effects)

वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्ज

वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे. कार कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे. कार कर्जामध्ये, तुम्ही त्या कर्जाची पूर्ण परतफेड करेपर्यंत तुमची कार बँकेकडे गहाण ठेवली जाते. वैयक्तिक कर्ज देताना कोणतीही बँक अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर यांसारख्या बाबी विचारात घेते.

काय आवश्यक आहेत

समजा तुम्ही 15 लाख रुपयांची कार(Car) खरेदी करू इच्छित असाल तर बँका या किमतीच्या 80-90 टक्के इतके कर्ज सहज देऊ शकतात. तुमच्याकडे ईएमआय भरण्याची क्षमता असली पाहिजे. अनेक बँका कारच्या किमतीच्या 100 टक्क्यांपर्यंत कर्जही देत ​​आहेत.

वैयक्तिक कर्ज

पर्सनल लोन घ्यायचे असेल तर बँकेकडे सिक्युरिटी म्हणून काही नसते. तुमचा क्रेडिट हिस्ट्री आणि कर्ज परतफेडीची क्षमता म्हणजेच उत्पन्न पाहूनच त्यांना कर्ज द्यावे लागते. दुसरीकडे, वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) कार, मालमत्ता, मौल्यवान दागिने गहाण ठेवण्याची गरज नाही. यासाठी तुमचे मासिक उत्पन्न आणि क्रेडिट स्कोर चांगला असावा.

कार कर्ज

जर तुम्ही कार लोन (Car Loan) घेऊन नवीन कार खरेदी केली तर तुम्ही कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड करेपर्यंत ती कार पूर्णपणे तुमची नसते. म्हणजेच कर्ज पूर्ण होईपर्यंत कारची मालकी तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेता त्या बँकेकडे असते. नवीन कारची कागदपत्रे बँक किंवा वित्तीय संस्थेकडे गहाण आहेत. जर तुम्ही दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली नाही, तर बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या कारचा लिलाव करून तुमचे पैसे वसूल करू शकतात.

कार कर्ज स्वस्त आहे

बहुतांश बँका वैयक्तिक कर्जावर जास्त व्याज आकारतात. पण त्या तुलनेत कार कर्जावरील व्याजदर कमी आहे. तर वैयक्तिक कर्जे असुरक्षित असल्यामुळे महाग आहेत. या दोनपैकी कोणत्याही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, व्याजदरांची तुलना करावी.