aadhaar card pan card link
aadhaar card pan card link

आधार कार्ड (AADHAAR CARD) आणि पॅन कार्ड (PAN card) लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे. आता या विभागाने त्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे, ज्यामुळे तुम्ही आधारला आणि पॅन सहजपणे लिंक करू शकता.

यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याच पॅन आणि आधार कार्ड ऑनलाइन लिंक करू शकता. ३१ मार्चपर्यंत तुम्ही आधार-पॅन लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड काम करणार नाही.

या कारणास्तव तुम्ही योग्य वेळी पॅनला आधारशी लिंक करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला प्रथम आयकर विभागा (Income Tax Department) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. नंतर तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या ब्राउझरमध्ये www.incometax.gov.in उघडू शकता.

वेबसाइट (Website) वर जाऊन तुम्हाला क्विक लिंकवर क्लिक करावे लागेल आणि आधार लिंकच्या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नाव द्यावे लागेल.

यानंतर तुम्हाला आधार लिंकचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल (Mobile) नंबरवर एक OTP येईल. ते प्रमाणित करा. यानंतर तुमचा आधार तुमच्या पॅनशी लिंक केला जाईल. जर तुमचा आधार आधीच पॅनशी जोडलेला असेल, तर तुम्हाला त्यावर एक संदेश (Message) दिसेल की, तुमचा आधार आधीच पॅनशी लिंक आहे.

जर तुम्ही आधीच आधार-पॅन लिंक करण्याची विनंती केली असेल, तर तुम्ही उजव्या बाजूला दिलेल्या लिंक आधार स्टेटसवर क्लिक करून ते तपासू शकता. यानंतर, तुम्हाला आधार आणि पॅन क्रमांक देऊन View Link Aadhaar Status वर क्लिक करावे लागेल. ज्याद्वारे तुम्हाला आधार-पॅन लिंकची स्थिती कळेल.