मुंबई : कलाक्षेत्रातले अनेक कलाकार सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. कधी त्यांच्या कपड्यांमुळे, कधी त्यांच्या सिनेमामुळे, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळे. असाच काहीस ट्रोलिंगचा प्रकार अभिनेता विकी कौशलसोबत घडला होता. याबद्दल दिलेल्या एका मुलाखतीत विकीने वक्तव्य करत या ट्रोलर्सला चांगलेच खडेबोल सुनावले होते.

विकीने एक फिल्मफेअरची मुलाखत दिली होती. या मुलाखतीत विकीवरील त्या ट्रोलिंगचा उल्लेख केला गेला होता. एका नेटकऱ्यानं चक्क विकीला ट्रोल करत म्हंटल होत की, ‘आयुष्यात यश मिळाल्यावर सलमान खानसारखं बनू नकोस’ आणि याच ट्रोलिंगवर विकीला मुलाखतीत उत्तर द्यायला सांगितलं होतं.

त्यावर उत्तर देताना विकीनं पहिलं तर विकी दोन मिनिटं काही बोलूच शकला नाही पण नंतर लगेच ‘हा फिर?’ असं बोलून ‘आयुष्यात यश मिळाल्यावर सलमानसारखं…’; विकी कौशल ट्रोलर्सच्या निशाण्यावरपुढच्या ट्रोलिंग ट्वीटकडे वळूया अस म्हणाला होता. विकीच्या या उत्तरावर हे समजले होते की, त्याला सलमानशी काही पंगा घ्यायचा नव्हता. म्हणून त्याचे या प्रश्नाचे उत्तर उडवून लावले होते. विकीची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली होती.