मुंबई : ‘चला हवा द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या बेधडक वक्तव्यांसाठी कायम चर्चेत पाहायला मिळतो. त्याच्या या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होतात. त्यात आता कुशल बद्रिकेने नुकतीच एक इन्स्टा पोस्ट केली आहे, ज्यात कुशलने ‘ब्लॅक आणि वाईट रंग चालतील पण बरबाद करणारे रंग नको’ असे म्हंटल आहे. कुशलची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय झाली आहे.

कुशलनं इन्स्टावर त्याचे काही ब्लॅक अॅण्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की, “एखाद्या फोटो मधले रंग ‘burst’ झाले की तो फोटो घाणेरडा दिसतो, मग त्या फोटोला black and white करायचं, तोच फोटो एकदम भारी दिसायला लागतो. आयुष्याचही तसंच आहे black and white चालेल, पण बरबाद करणारे रंग नकोत!” अस या पोस्टमध्ये कुशलने खास कॅप्शन लिहिले आहे.

कुशल बद्रिकेची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांना खूप आवडतं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकजण लाईक्स आणि कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या त्याची ही पोस्ट आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याचेही पाहायला मिळत आहे.