LIC Scheme : (LIC Scheme) महिलांसाठी अनेक योजना असतात. बऱ्याच याचा फायदासुद्धा होतो. भारतीय जीवन बीमा निगमची सुद्धा अशीच एक स्कीम आहे. ज्याद्वारे फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर चक्क 4 लाखांचा परतावा मिळू शकतो. भारतीय बिमा निगमच्या (LIC) आधार शीला योजनेद्वारे महिलांना (Women) हा लाभ मिळू शकतो. जाणून घ्या या स्कीमबद्दल.

एलआयसीची ही योजना महिलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे. पैसे वाचवण्याचा हा एक मार्ग आहे. महिला या योजनेत 29 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात.

पॉलिसी परिपक्व झाल्यावर, महिलांना 4 लाखांपर्यंतचा लाभ देखील मिळू शकतो. एलआयसी ही योजना विशेषतः महिलांसाठी चालवते. थोड्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला काही वर्षांत चांगला नफा मिळू शकतो.

या योजनेचा (Adhaar Sheela Yojana) लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. LIC आधार शीला योजनेची मूळ विमा रक्कम किमान रु 75000 आणि कमाल रु 3 लाख आहे.

या पॉलिसीची मुदत किमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे. 8 ते 55 वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेअंतर्गत, तुम्हाला दर वर्षी/महिना प्रीमियम भरावा लागेल.

पॉलिसीच्या (Adhaar Sheela Yojana) मॅच्युरिटीवर तुम्हाला पैसे मिळतील. महिलांनी 20 वर्षांसाठी दररोज 29 रुपये गुंतवल्यास तुमच्याकडे 11,000 रुपये असतील. दुसरीकडे, जर तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 900 रुपये गुंतवले तर तुमची गुंतवणूक 2 लाख रुपये आहे. मग मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 4 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.