मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस ही उतरत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हंटले की, ‘जम्मू काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा. मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे योग्य आणि खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला आधिकआधिक पाहता यावा यासाठी करमुक्त करावा.’ अशी विनंती त्यांनी या ट्वीटच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धवा ठाकरे यांच्याकडे केली आहे. नितेश राणे यांच्या विनंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातच काश्मिरी नरसंहाराचे वेदनादायक आणि भावनिक चित्र मांडण्यात आले आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार, अमन इक्बाल, दर्शन कुमार, भाषा सुंबळी आणि इतर अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.