malayka
Leaving Mumbai, Malaika crossed the sea to meet him ...

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्यामुळे तसेच फिटनेसमुळे सतत चर्चेत असते. मलायका नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. मलायका नेहमी प्रियकर अर्जुन सोबतचे वेकेशन (Vacation) फोटो शेअर करताना दिसते.

मलायका तिच्या कामासोबतच खागजी आयुष्यातील गोष्टींमुळेही ती खूप चर्चेत असते. अभिनेत्री नुकतीच न्यूयॉर्कला रवाना झाली आहे. येथील काही फोटो मलायकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साता समुद्र पार मलायका आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेली आहे. फोटो शेअर करत तिने याची माहिती दिली आहे.

मलायका अरोराने शेअर केलेल्या फोटोत अरहान पुढे चालताना दिसत आहे, आणि मलायका त्याच्या सोबत फिरताना दिसत आहे. मालयकाने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

मुंबई सोडून अभिनेत्री सध्या आपल्या मुलासोबत न्यूयॉर्कमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहे. मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान परदेशात शिक्षणासाठी गेला आहे.