मुंबई : ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरेचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शिव चक्क बॉलीवूडची सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्री मलायका अरोरासोबत दिसत आहे. या व्हिडीओमुळे शिव जोरदार चर्चेतही पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर या व्हिडिओमध्ये मलायका आणि शिव दोघे रोमांसही करताना दिसत आहे.

शिव ठाकरेने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात दोघांनी रोमँटिक रील केलेला दिसत आहे. दोघांनीही बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘आखो मे तेरी अजब सी’ गाण्यावर रोमँटिक रील बनवली आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये मलायकाने पिवळ्या कलरचा फ्लोअर टच ड्रेस परिधान केला असून त्यावर लाँग मरुम कलरचे जॅकेट परिधान केले आहे. तर शिवने मलायकाच्या जॅकेटला मॅच होईल असा कोट परिधान केला आहे. दोघेही यावेळी खूप आकर्षक दिसत आहेत.