भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) दररोज प्रमाणे आज (रविवार) 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) चे नवीनतम दर अपडेट केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाजारात वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज सलग चौथ्या दिवशी स्थिर आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत.
एप्रिल महिन्यात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी बुधवारी (६ एप्रिल) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
मुंबईशिवाय या शहरांमध्ये पेट्रोल 120 रुपयांच्या पुढे –
इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) त पेट्रोल 120.51 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईशिवाय राजस्थानच्या श्री गंगानगर (Sri Ganganagar) आणि मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात पेट्रोलचा दर 120 रुपयांच्या पुढे आहे.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर –
दिल्ली –
पेट्रोल – 105.41
डिझेल – 96.67
मुंबई –
पेट्रोल – 120.51
डिझेल – 104.77
कोलकाता –
पेट्रोल – 115.12
डिझेल – 99.83
चेन्नई –
पेट्रोल – 110.85
डिझेल – 100.94
कोलकाता (Kolkata) बद्दल बोलायचे झाले तर इथे एक लिटर पेट्रोल 115.12 रुपये, तर डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅटच्या वेगवेगळ्या दरांमुळे, शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत. 22 मार्चपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या वर पोहोचला आहे.
त्याचबरोबर देशातील अनेक शहरांमध्ये डिझेलच्या दरातही इतकी वाढ झाली आहे की, दर प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. 22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे.