मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील फेम अभिनेता गौतम नैनबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गौतमच्या घरी एका गोड मुलाचे आगमन झाले असून गौतम आता बाबा झाला आहे. 12 एप्रिल 2022 रोजी गौतमची पत्नी सोफी मार्चूने मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी गौतमने त्याच्या सोशल मीडियावर दिली आहे.
गौतमने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात गौतम हॉस्पिटलचे कपडे घातलेला दिसत आहे आणि त्याने आपल्या बाळाला छातीशी धरले आहे. फोटो शेअर करताना गौतमने सांगितले की, ‘हा मुलगा आहे. वडील होणे ही सर्वात चांगली भावना आहे.’ यासोबतच गौतमने हॉस्पिटलमधील आणखी काहि फोटो शेअर करत वडील होण्याचा आनंद व्यक्त केला आहे.
यातील दुसऱ्या फोटोत गौतम आपल्या पत्नीसोबत दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘ सगळ्यात चमत्कारी दिवस आहे हा आई झाल्याचा’ या पोस्टसोबतच गौतमने आपल्या मुलाचे नाव उघड करत “इशान नैनचे स्वागत आहे.’ असं लिहल आहे. गौतमच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने त्याचे चाहते ही खूप आनंदी पाहायला मिळत आहेत. अनेक सेलिब्रेटींनी या जोडप्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.