मुंबई : बॉलीवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काल 14 एप्रिल रोजी लग्न केले आहे. या लग्नावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता अभिनेता कमाल आर खाननेही या लग्नावर आपली प्रतिक्रिया देत बॉलीवूडवर निशाणा साधला आहे.
केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘बॉलिवूड किती छान कुटुंब आहे याचा पुरावा म्हणजे आलिया भट्टचा चुलत भाऊ इम्रान हाश्मीला लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले नाही.’ अशाप्रकारे केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह 14 एप्रिल रोजी मुंबईतील वास्तू अपार्टमेंटमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाला. सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटोंचा बोलबाला आहे. या जोडप्याने लग्नानंतर जोरदार डान्सही केला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नात नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, सोनी राजदान, शाहीन भट्ट, पूजा भट्ट, राहुल भट्ट, करिश्मा कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी, नव्या नवेली नंदा या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.