पुणे : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामातील सहावा सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. केकेआरने त्यांच्या पहिल्या सामन्यात सीएसकेचा 6 गडी राखून पराभव केला होता, तर आरसीबीला पहिल्या सामन्यात पंजाबकडून 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
सामना क्रमांक 6
स्थळ- डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई
वेळ – सकाळी 7:30
टॉस – संध्याकाळी 7.00
डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली आहे, वेगवान गोलंदाजांना येथे बाऊन्स मिळतील. आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात आरसीबीने येथे 205 धावा केल्या होत्या, तर पंजाबने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. त्याच वेळी, सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाईल. Jio वापरकर्ते Jio TV वर सामना पाहू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, शर्फीन रदरफोर्ड, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, आकाश दीप, मोहम्मद सिराज, डेव्हिड विली.
केकेआर :
व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (क), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.