Kisan Vikas Patra : (Kisan Vikas Patra) पैश्यांची योग्य गुंतवणूक महत्वपूर्ण ठरते. जर तुम्ही सुद्धा आपले पैसे (Money) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सरकारची किसान विकास पत्र (KVP) ही योजना तुम्हाला फायद्याची ठरेल. जाणून घ्या या योजनेबद्दल.

तुम्ही तुमचा पैसा कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम योजना (Kisan Vikas Patra) आहे. यामध्ये पैसे गमावण्याचा धोका नाही आणि परतावा देखील मजबूत असेल. तुम्ही या योजनेत  5 लाख रुपये गुंतवल्यास, 124 महिन्यांनंतर तुमचे पैसे दुप्पट होतील. तुम्हाला तब्बल 10 लाख रुपये परत मिळतील.

योजनेत असा लाभ मिळतो

किसान विकास पत्र(Kisan Vikas Patra) योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना योजनेत चक्रवाढीचा लाभ मिळतो. तुम्ही या योजनेत फक्त छोट्या रकमेतून गुंतवणूक (Investment)सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. किसान विकास पत्र ची सुविधा देशातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते.

एक हजार रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

या योजनेत (Kisan Vikas Patra)एक हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात आणि गुंतवणुकीसाठी कोणतीही अंतिम मर्यादा नाही. तुमचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास एकल किंवा संयुक्त खाते उघडता येते. गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या खात्यातून किमान अडीच वर्षे पैसे काढू शकणार नाही. किसान विकास पत्र योजनेत आयकर सवलत देखील उपलब्ध आहे.

मिळू शकतो एवढा व्याज

सध्या या योजनेत 6.9 टक्के व्याज उपलब्ध आहे. वित्त मंत्रालयाने केलेल्या घोषणांच्या आधारे किसान विकास पत्र वर लागू होणारे व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात आणि लवकरच त्यावरील व्याजदर वाढवले ​​जातील अशी अपेक्षा आहे.

सध्याच्या नियमांनुसार, KVP प्रमाणपत्रे सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच भारतातील पोस्ट ऑफिसमधून खरेदी केली जाऊ शकतात. तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसमधून KVP प्रमाणपत्र खरेदी करू शकता. यासह, तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिस आणि निवडक बँकांमधून KVP अर्ज ऑनलाइन खरेदी करू शकता.