मुंबई : बॉलीवूडची डान्सिंग डॉल नोरा फतेही लवकरच एका डान्सिंग शोची जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या टीव्ही शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत. ज्यामध्ये नोरा ज्युनियर डान्सरसोबत डान्स करताना दिसत आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रोमोमधील डान्स बघून नोराचे चाहते तर घायाळच झाले आहेत.

‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये दिसते की, नोरा शाळेत लहान मुलांना शिकवताना दिसत आहे, त्यानंतर शाळेची बेल वाजते आणि एक ज्युनिअर डान्सर डान्स करायला लागते हे पाहताच नवराही तिच्या जबरदस्त डान्स मूव्ह्स एका आकर्षक अवतारात दाखवते. या प्रोमोची खास गोष्ट म्हणजे नोरा आपल्या ओल्या शरीराने स्टेजला आग लावत आहे. यावेळी नोरा ‘टिप-टिप बरसा पानी’ या प्रसिद्ध गाण्यावर ठुमकत शॉवरखाली डान्स करत आहे. या व्हिडिओने प्रेक्षकांनाच्या झोपाच उडवल्या आहे.

दरम्यान, ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या शोमध्ये नोरा फतेही व्यतिरिक्त बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर आणि मरझी पेस्टोनजी देखील जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा शो लहान मुलांचा असल्यामुळे यात आणखी रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.