मुंबई : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता ‘KGF Chapter 2’ लवकरच रिलीज होणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट बंपर कमाई करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. याचे कारणही असेच आहे. कारण या चित्रपटाचे प्री-बुकिंग सुरू झाले आणि प्री-बुकिंग सुरू झाल्यापासून या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.
बुकिंग सुरू झाल्यानंतर फक्त 12 तासांत ‘KGF Chapter 2′ या चित्रपटाची पाच हजारांहून अधिक तिकिटे बुक झाली आहेत. यावरून KGF Chapter 2’ या चित्रपटाची चाहते किती आतुरतेने वाट पाहत आहेत, हे दिसत आहे. यामुळेच प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज बांधला जात आहे.
दरम्यान, ‘KGF’ चा पहिला भाग 2018 साली आला होता. त्यांनतर कोरोना महामारी आल्यामुळे ‘KGF Chapter 2’ रिलीज होण्यास विलंब झाला. आता अखेर प्रशांत नील दिग्दर्शित ‘KGF Chapter 2′ हा चित्रपट 14 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. देशातच नाही तर परदेशातही KGF Chapter 2’ या चित्रपटाच्या चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे.
तसेच, ‘KGF Chapter 2’ हा ग्रीसमध्ये प्रदर्शित होणारा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात यश, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट कन्नड, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.