मुंबई : सुपरस्टार यशचा आगामी चित्रपट KGF 2 लवकरच थिएटरमध्ये पोहोचणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच जबरदस्त क्रेझ आहे. यातच आता नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलने तर खळबळ उडवून दिली आहे. यामुळे KGF 2 च्या ट्रेलरने दिग्दर्शक राजामौली यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या RRR चित्रपटाला मागे टाकले आहे.

KGF 2 च्या ट्रेलरने जबरदस्त व्ह्यूज मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, KGF 2 ने सर्व भाषांमधील ट्रेलर एकत्र करून 15 तासांत 70 दशलक्ष व्ह्यूजचा विक्रम केला आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाला 24 तासांत सर्वाधिक 57.5 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट RRR या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 51.12 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. KGF2 च्या ट्रेलरनेच एवढे रेकॉर्ड मोडले आहेत तर चित्रपट किती रेकॉर्ड मोडेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘KGF Chapter 2’ हा 2018मध्ये आलेल्या ‘KGF’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. मागच्या चित्रपटात यशच्या रॉकी भाई या पात्राची थेट गरुडाशी लढाई दाखवण्यात आली होती. आता नव्या चित्रपटात तो अधीराशी स्पर्धा करणार आहे, जी खूपच धोकादायक आहे. चित्रपटात संजय दत्त अधीराची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज हे कलाकार देखील झळकणार आहेत.