मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच पती विकी कौशलसोबत सुट्यांचा आनंद घेऊन घरी परतली आहे. या ट्रिपचे अनेक फोटो, व्हिडिओ कतरिना तिच्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. दरम्यान, नुकतेच कतरीनाने तिचे काही बिकिनी फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यामुळे चाहत्यांना भूरळच पडली आहे.

कतरिना कैफने गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे तीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कतरिना कैफने काळ्या रंगाचा स्विमसूट घातला असून तिने ब्लॅक अँड व्हाईट हॅटही घातली आहे. तिन्ही फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. कॅटरिना कैफचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. अनेकजण फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ आता सलमान खानसोबत ‘टायगर 3’. तर सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत ‘फोनभूत’ आणि प्रियांका चोप्रा, आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ आणि ‘मेरी ख्रिसमस’मध्ये काम करत आहे.