anupam kair
Kashmiri Pandit arrives at senior actor Anupam Kher's house ...

मुंबई : अलीकडेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्या दिवसापासून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्या दिवसापासून चर्चेत आहे. चित्रपटाला रिलीज होऊन आता महिना होत आहे पण या चित्रपटाची चर्चा अजून थांबलेली नाही. चर्चेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 234 करोडचा टप्पा पार केला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट रिऍलिस्टिक आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

या चित्रपटात काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवलेला आहे. तसेच हा चित्रपट पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित असल्याचे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हंटले आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट पाहून अनेक जण भावूक झाले तर काहींनी या चित्रपटावर टीकासुद्धा केली.

एकीकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटातील कलाकारांच्या उत्तम अभिनयाचं कौतुक होत आहे, इतकंच नाही तर अनेक जण चित्रपटातील कलाकारांना भेटून प्रेम व्यक्त करत आहेत.

यातच अनुपम खेर यांनी देखील त्यांच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोन पंडित त्यांची पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले की, “#TheKashmirFiles चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या दिवशी माझ्या घराखाली पंडित किंवा पुजारी येतात आणि पूजा करून काही न मागता निघून जातात. त्यांचा आशीर्वाद मिळवून मी कृतार्थ आणि कृतघ्न झालो आहे, हर हर महादेव!”

‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्येअनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेवर आधारित आहे.