the kashmir files
'Kashmir Files' made record earnings; Both Akshay Kumar's films were hit hard

मुंबई : विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 200 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. कोरोना महामारीनंतर शर्यतीत असलेल्या अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने ‘बच्चन पांडे’ला स्पर्धेतून बाहेर फेकले आहे.

गुरुवारी ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट समोर आल्यानंतर, कोरोना महामारी नंतर भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 200.13 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी हा करिष्मा अजय देवगणच्या 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘तानाजी’ या चित्रपटाने केला होता.

प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड ब्रेकिंग आकडे ट्विट केले. तरणने लिहिले की, ‘काश्मीर फाइल्सने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 19.15, शनिवार 24.80 कोटी, रविवार 26.20 कोटी, सोमवार12.40 कोटी, मंगळवार 10.25, बुधवार-10.03, तर भारतात एकूण 200.13 कोटी व्यवसाय.

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी चित्रित करणाऱ्या विवेक अग्निहोत्रीने 1990 सालातील वेदनादायक दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. असे अनेक पैलू या चित्रपटात समोर आणले गेले आहेत, ज्यांची माहिती अनेकांना नव्हती. विवेकने स्वतः या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.