मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच आठवडे झाले असले तरी चित्रपट अजूनही तोडफोड कमाई करत आहे. याचा परिणाम असा झाला की या काळात आलेले सर्व चित्रपट कश्मीर फाईल्स चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर आपली पखड जमऊ शकले नाही. यातच होता अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट. लोकांच्या अंदाज नुसार हा चित्रपट रेकॉर्ड तोडेल पण असे काही न होता चित्रपट फ्लॉप झाला. दरम्यान, यासंदर्भात अक्षय कुमारने वक्तव्य केले आहे.

वास्तविक, अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार ‘द काश्मीर फाइल्स’चे कौतुक करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अक्षय कुमार म्हणतोय की, ‘चित्रपटाने एक कटू सत्य समोर आणले, विवेक अग्निहोत्री जी यांनी काश्मीर फाइल्स बनवून आपल्या देशाचे एक अत्यंत क्लेशदायक सत्य समोर आणले आहे, हा चित्रपट अशी लाट आली आहे. आम्ही सर्व थक्क झालो. यानंतर अक्षय कुमार ‘बच्चन पांडे’बद्दल बोलताना हसला आणि म्हणाला, हो ही वेगळी गोष्ट आहे की माझा चित्रपटही बुडाला’. अशी प्रतिक्रिया अक्षय कुमारने यावेळी दिली.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 79.25 कोटी रुपयांची कमाई केली. तर सातव्या दिवशी चित्रपटाने 19.05 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आता 200 कोटींची कमाई केली आहे.