Kartik Aryan And Sara Ali Khan : सारा अली खान (Sara Ali Khan) आणि कार्तिक आर्यनच्या(Kartik Aryan) ब्रेकअपच्या चर्चा सर्वत्र होती. मात्र नुकत्याच झालेल्या OTT(OTT Awards) अवॉर्ड शोमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसले. यामुळे आता हे पुन्हा चर्चचा विषय बनले आहेत. या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या ओटीटी प्ले अवॉर्ड्समध्ये रेड कार्पेट ताऱ्यांनी सजलेले दिसले. या कार्यक्रमाला बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

मात्र, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकच टेबल शेअर करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन काळ्या सूट आणि टायमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, सारा अली खान गोल्डन ऑफ शोल्डर सिक्विन ड्रेसमध्ये कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.

सर्वांचे लक्ष पुरस्कार वितरणाकडे लागले असताना, सारा आणि कार्तिक एकमेकांशी गप्पा मारण्यात हरवलेले दिसतात. दोघांचा हा व्हिडिओ पाहून चाहते आता त्यांच्या पॅचअपचा अंदाज लावत आहेत.

सारा कार्तिक एकमेकांना चिअर करताना दिसले

कार्तिक आर्यनसाठी OTT Play Awards 2022 खूप खास होता. शोमध्ये कार्तिकला ‘धमाका’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तेव्हा साराने टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन केले.

त्याच वेळी, जेव्हा सारा अली खानला ‘अतरंगी रे’ चित्रपटासाठी इव्हेंटमध्ये ‘ब्रेकथ्रू परफॉर्मन्स फॉर द इयर’ पुरस्कार मिळाला, तेव्हा कार्तिकच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहण्यासारखा होता. तो तिला शुभेच्छा देतानाही दिसला.