मुंबई : करीना कपूर खान आणि सैफ अली खानचे जेऊ आणि तैमुर दोन्ही मुलं कायम सोशल मीडियावर आग लावत असतात. करीना तिच्या दोन्ही मुलांचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. या पोस्ट खूप व्हायरलही होतात. दरम्यान, नुकताच करिनाच्या धाकट्या मुलगा जेहचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यातील जेहचा लूक पाहून चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सैफ अली खानची बहीण सबा पतौडीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर छोट्या जेहचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये करीना आणि सैफचे धाकटे नवाब जेह खूप क्यूट दिसत आहे. फोटोमध्ये जेह काळा चष्मा घातलेला ग्रे कलरच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. जेहने टी-शर्टवर एक बिब लावला आहे, ज्यावर लिटिल सोल्जर असे लिहिले आहे. त्याच वेळी, चष्म्यातील लहान जेहची पोझ, त्याची स्टाईल इतकी गोंडस आहे की चाहते जेहच्या चित्रावरून नजर हटवू शकत नाहीत.

छोट्या जेहच्या चष्म्यातील क्युट स्टाइल चाहत्यांना खूप आवडत आहे. फोटोवर कमेंट करत चाहते पोस्टवर प्रेम व्यक्त करत आहेत. यात एका यूजरने कमेंट करत लिहल की, ‘माशाअल्लाह’ आणि त्याच्यासोबत त्याने अनेक हार्ट इमोजी टाकले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले, ‘लव्ह यू जेह’. आणखी एका यूजरने जेहचे कौतुक करत लिहिले की, ‘अरे… देवा, सर्वात सुंदर चित्र. या फोटोने माझा दिवस बनवला’, अश्या अनेक कमेंट करत चाहते जेह प्रति आपले प्रेम व्यक्त करत आहेत.