मुंबई : आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सगळीकडे रंगच रंग दिसत आहेत. बॉलीवूड कलाकारही आज होळीच्या दिवशी धमाल-मस्तीचे फोटो शेअर केरत आहेत. यातच अभिनेत्री करीना कपूरने सेलिब्रेट केलेली होळी मात्र, सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकताच बेबोने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये करीना आणि जेह बीचवर बसलेले दिसत आहेत. दरम्यान, यावेळी करीनाने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. आपल्या मुलासोबत खेळताना करिनाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. तसेच, फोटो शेअर करताना करिनाने लिहिले की, ‘होळीच्या दिवशी आम्ही वाळूचा महाल बांधला… होळीच्या शुभेच्छा’. करिनाचा हा फोटो व्हायरल झाला असून. करिनाच्या या फोटोवर केवळ तिच्या चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे.

करीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करीना लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली आहे. वास्तविक, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊ न शकल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून आता हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.