मुंबई : ‘बिग बॉस 15’चे लोकप्रिय कपल करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश शोमधून बाहेर आल्यानंतरही दोघांचे नाते पुढे नेत आहेत. लवकरच दोघे लग्नही करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर आता नुकतच करण कुंद्राने वक्तव्य केले आहे.

करणने आरजे सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संवादात त्याच्या आणि तेजस्वीबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी लग्नाच्या मुद्द्यावरून कन्ननने करणची छेड काढली. तेव्हा करण म्हणाला, “मी तेजस्वीसोबत लग्न करणार आहे हे सत्य आहे. भारतातून ठरलेले हे पहिले लग्न आहे की ते होणारच आहे. बिग बॉसच्या घरात असल्यापासून मी तेजस्वीशी लग्न करायचे ठरवले आहे. आम्हाला कोणीच विचारत नाही.” पुढे लग्नाच्या तारखेबद्दल विचारले असता करण म्हणाला, “आम्ही आता डेट करत आहोत. लवकरच लग्न करू पण अजून तारीख ठरवलेली नाही.” असं करण म्हणाला.

दरम्यान, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट ‘बिग बॉस 15’च्या घरात झाली होती. तिथे दोघेही आधी एकमेकांचे मित्र बनले होते, त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि शो संपून झाला असला तरी हे कपल एकत्र आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना स्पॉट होतात. दोघांची ही जोडी त्यांच्या चाहत्यांना ही खुप आवडते.