मुंबई : ‘बिग बॉस 15’ पासून चर्चेत आलेला अभिनेता करण कुंद्रा आता लवकरच मोठ्या पडद्यावर आपले पदार्पण करणार असल्याच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहेत. या संदर्भात नुकतीच एक माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, करण कुंद्रा लवकरच बॉलीवूडच्या दोन मोठया स्टार्ससोबत चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

करण कुंद्रा लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्याची माहिती इन्स्टंट बॉलीवूडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इलियाना डिक्रूझ आणि रणदीप हुडा देखील दिसणार आहेत. मात्र, या तीन स्टार्सकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. सध्या ही बातमी येताच त्याचे चाहते खूप खुश आहेत आणि करण कुंद्राला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

करण कुंदा ‘बिग बॉस’च्या 15 व्या सीझनमध्ये दुसरा रनर अप होता. त्याने ‘MTV रोडीज’चा 14वा सीझन जिंकला होत. तो अनेक म्युझिक व्हिडिओ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये दिसला आहे. तसेच अनेक रिअॅलिटी शोही त्याने होस्ट केले आहे. करण कुंद्राने 2009 मध्ये ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले आणि त्यानंतर तो अनेक टीव्ही शोमध्ये दिसला. त्यांनी ‘1921’ आणि ‘मुबारकान’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.