मुंबई : ‘बिग बॉस 15’ पासून चर्चेत आलेला अभिनेता करण कुंद्रा आता लवकरच मोठ्या पडद्यावर आपले पदार्पण करणार असल्याच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहेत. या संदर्भात नुकतीच एक माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, करण कुंद्रा लवकरच अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आणि रणदीप हुड्डासोबत एका बॉलिवूड चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

माहितीनुसार, करण कुंद्राचा हा प्रोजेक्ट याच वर्षी सुरु होऊ शकतो. मात्र, सध्या तरी या चित्रपटाबाबत इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. करण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आपली ताकद दाखवणार नाही. याआधी करण कुंद्राने ‘1921’, ‘मुबारकान’ आणि ‘हॉरर स्टोरी’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दरम्यान, करण कुंद्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तो सध्या कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ शोमध्ये जेलर बनलेला दिसत आहे. तो लवकर ‘खातरो के खिलाडी’ शो होस्ट करणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच, त्याचा तेजस्वी प्रकाशसोबतचा ‘रुला देती हे’ हा अल्बम व्हिडिओही रिलीज झाला आहे. जो प्रेक्षकांनाही खूप आवडला आहे.