Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; कापसाच्या बाजारभावात मोठा बदल, आज ‘एवढा’ मिळाला भाव, वाचा….

0

Kapus Market 2023 : कापूस हे राज्यासह संपूर्ण भारतात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आपल्या राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते.

या संबंधित भागातील शेतकऱ्यांचे कापसावरच अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या वर्षापासून कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे.

पिक उत्पादित करण्यासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाहीये. यंदा तर शेतकऱ्यांना कमी पावसामुळे कापसाचे अपेक्षित असे उत्पादन देखील मिळणार नाहीये.

यामुळे यावर्षी मालाला किमान आठ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.तूर्तास मात्र कापसाचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच पाहायला मिळत आहेत.

दिवाळीपूर्वी मात्र कापसाला एवढाही भाव मिळत नव्हता. दिवाळीपूर्वी राज्यातील अनेक बाजारात कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दरात विकला जात होता.

दरम्यान आज अर्थातच 30 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 7175 रुपये खर्च करून एवढा कमाल दर मिळाला आहे. सरासरी बाजार भावाचा विचार केला असता आज 6950 ते 7150 एवढा सरासरी दर मिळाला आहे.

कुठं मिळाला विक्रमी भाव

राळेगाव एपीएमसी : या बाजारात आज 2500 क्विंटल पांढऱ्या सोन्याची आवक झाली होती. आजच्या लिलावा त्या मार्केटमध्ये कापसाला किमान 6800, कमाल 7105 आणि सरासरी 7050 एवढा भाव मिळाला आहे.

उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान सात हजार रुपये प्रति क्विंटल, कमाल 7 हजार 90 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 7 हजार 40 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6900, कमाल 7000 आणि सरासरी 6950 एवढा भाव मिळाला आहे.

सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये आज कापसाची 900 क्विंटल एवढी आवक झाली होती. आजच्या लिलावात या बाजारात कापूस किमान 7,100, कमाल 7175 आणि सरासरी 7150 या भावात विकला गेला आहे.