Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

पांढरं सोनं यंदा तरी सावरणार का ? सध्या कापसाला काय भाव मिळतोय ? वाचा

0

Kapus Bajarbhav : दिवाळीपूर्वी पांढऱ्या सोन्याचे भाव अर्थातच कापसाचे भाव फारच दबावात होते. पण रब्बी हंगामाला आणि दिवाळीला शेतकऱ्यांना पैशांची गरज होती. यामुळे बाजार भाव कमी होता तरीही अनेक कापूस उत्पादकांनी आपला माल विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

पण दिवाळीनंतर बाजाराची परिस्थिती थोडीशी बदलली आहे. दिवाळीच्या आधी राज्यातील बहुतांशी भागात कापसाला सात हजारापेक्षा कमी भाव मिळत होता. पण दिवाळीनंतर कापूस पंढरी म्हणून लोकप्रिय असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली.

या बाजारात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी कापसाला तब्बल सात हजार 690 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. दरम्यान काल झालेल्या लिलावात अर्थातच 24 नोव्हेंबर रोजी अकोला येथील अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 7650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.

त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर गेल्या अनेक दिवसानंतर समाधान पाहायला मिळाले आहे. शेतकऱ्यांमध्ये भाव वाढ झाली असल्याने सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरे तर गेल्या दोन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता.

विशेष म्हणजे त्यावर्षी कापसाला सरासरी 8000 चा भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा देखील तसा भाव मिळणार का हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली असल्याने विक्रमी बाजार भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

मालाला किमान 8000 चा भाव मिळावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या स्थितीला मात्र बाजारात कापसाला 7000 ते 7395 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर कापसाला मिळत आहे. तसेच सरासरी बाजार भाव 6890 ते 7300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

राज्यातील प्रमुख बाजारात आज काय भाव मिळाला

राळेगाव एपीएमसी : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 7000, कमाल 7150 आणि सरासरी 7100 एवढा भाव मिळाला आहे.

मारेगाव एपीएमसी : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6850, कमाल 7050 आणि सरासरी 6,950 एवढा भाव मिळाला आहे.

पारशिवनी एपीएमसी : या बाजारात आज पांढरे सोनं किमान 6900, कमाल 7025 आणि सरासरी 695 या बाजारभावात विकला गेला आहे.

परभणी एपीएमसी : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 7280, कमाल 7395 आणि सरासरी 7375 एवढा भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कापूस किमान 7100, कमाल 7200 आणि सरासरी 7200 या भावात विकले गेले आहे.

उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज कापूस किमान 7000, कमाल 7 हजार 90 आणि सरासरी 7 हजार 30 या भावात विकले गेले आहे.

सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापूस किमान 7150, कमाल 7200 आणि सरासरी 7180 रुपये प्रति क्विंटल या भावात विकले गेले आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कापूस किमान 6310, कमाल 7000 आणि सरासरी 6810 प्रति क्विंटल या दरात विकले गेले आहे. 

फुलंब्री एपीएमसी : मराठवाड्यातील या मार्केटमध्ये आज पांढऱ्या सोन्याला किमान 7,100 कमाल, 7300 आणि सरासरी 7200 एवढा भाव मिळाला आहे.