मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून कपिलने त्याच्या वाढदिवशी एक रोप लावायचा सुंदर असा निर्णय घेतला आहे. हे रोप तो दर वर्षी लावतो. मात्र, या वेळेस वाढदिवशी रोप लावल्याने कपिल ट्रोल झाला आहे.

कपिल शर्माने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये कपिल शर्मा हिमाचल प्रदेशमध्ये आणखी एक रोप लावत असल्याचे सांगत आहे. कपिल शर्माने हातात एक रोप घेतले आहे. शेजारीच माती मिसळून खत आणि पाणी ठेवले जाते. कपिल शर्मा रोप लावल्यानंतर त्याला हे खत टाकायचे का? असा प्रश्न तिथल्या माळीला विचारतो आणि कपिल शर्मा नंतर ती माती टाकून रोप लावतो. कपिल शर्माने माळीला हा प्रश्न विचारल्यामुळे तसेच, रोप लावताना कपिलने बूट घातल्यामुळे नेटकर्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

पोस्टवर कमेंट करत एका ट्रोलने लिहिलं की, ‘भाऊ बूट घालून झाड कोण लावतं?’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘तुम्हाला रोप कसे लावावे हे माहित नाही?’. तसेच, आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘रोप लावले तर त्यालाही पाणी द्यावे लागेल. असो, दिवसा रोपटे कोण लावतात? सावलीत लागवड केली जाते. एकतर सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा सूर्य निघून जातो. कपिल शर्मा जी रोपे लावत आहेत, ते पूर्ण सूर्यप्रकाशात लावताना दिसत आहेत.’ अश्या अनेक कमेंट करत नेटकर्यांनी कपिलला ट्रोल केलं आहे.