मुंबई : आज बॉलीवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना राणौतचा वाढदिवस आहे. आज ति ३५ वर्षाची झाली आहे. या खास प्रसंगी कंगनाला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. यात आता अभिनेत्री करीना कपूर खानही तिला शुभेच्छा देण्यापासून मागे राहिली नाही.

करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये कंगनाचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे. हा फोटो शेअर करताना करीनाने, ‘माझी प्रिय कंगना रनौत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद, चमक आणि प्रेम असू दे.’ असं कॅप्शन लिहिलं आहे. करिनाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या आगामी ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कंगना लवकरच रामायणावर आधारित ‘सीता-द इनकार्नेशन’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर दुसरीकडे करीना कपूर लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे.