मुंबई : कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यातील नात फार जून आहे. कंगना नेहमीच करन जोहरवर निशाणा साधत असते. ती करण जोहरला सुनावण्याची एकही संधी सोडत नाही. आज पुन्हा एकदा कंगनाने करण जोहरवर थेट निशाणाच साधला नाही तर अप्रत्यक्षपणे करण जोहरची खिल्लीही उडवली आहे.
कंगना रणौत सध्या लॉकअप या वीक शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तिच्या या शोला 200 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. याविषयी माहिती देताना तिने करण जोहरवर निशाणा साधत तुमचे रडण्याचे दिवस आले आहेत. असे म्हंटले आहे.
कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘लॉकअपला 200 मिलियन व्ह्यूज होताच…संपूर्ण चंगु-मंगू सेना / गुपचूप त्यांच्या वडिलांसोबत रडत आहे, इतके पापड लाटूनही, 200 लाख बघा आणि आता पुढे बघा काय होते ते…पापा जी तुमचे रडण्याचे दिवस आले आहेत. असे म्हणत कंगनाने अप्रत्यक्षपाने निशाणा साधला आहे.
करणच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये उपस्थित असताना कंगनाने त्याला बॉलिवूडमधील ‘माफिया’ अशी उपमा दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. करण जोहरसह कंगनाने हृतिक रोशनवर देखील निशाणा साधला आहे.