मुंबई : एसएस राजमौली यांच्या RRR चित्रपटाने पहिल्या दिवसांपासून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहेत. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाने घर केलं आहे. दरम्यान, चित्रपटावर आता सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रनौत हिने प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत मीडियासमोर आली होती. यावेळी तिला ‘RRR’ चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. यावर तिने सांगितले की, तिला ‘RRR’ खूप आवडला आहे. कंगना राणौतच्या म्हणण्यानुसार, “‘ट्रिपल आर’ हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे… खूप मस्त चित्रपट आहे. देशभक्ती हा तसाच माझा आवडता विषय आहे. चित्रपटात असायला हवे ते सर्व आहे.” असं कंगना म्हणली.

दरम्यान, दिग्दर्शक राजामौलीचा नुकताच रिलीज झालेला ‘RRR’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेत 100 कोटींचा व्यवसाय पूर्ण केला असून जगभरात त्याची कमाई 600 कोटींच्या पुढे गेली आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण शिवाय अभिनेत्री आलीया भट्ट आणि अभिनेता अजय देवगणही आहे. अजय आणि आलियाने या चित्रपटातुन साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.