मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वादात अडकते. काही महिन्यांपूर्वी कंगणाने असेच काहीसे वादग्रस्त विधान गीतकार जावेद अख्तर यांच्या संदर्भात केले होते. त्यानंतर अख्तर यांनी कंगणावर मानहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आता मुंबई न्यायालयाने कंगनाला फटकारले आहे.

या प्रकरणात आपल्याला कायमची सुटका मिळावी अशी कंगणाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळत न्यायदंडाधिकारी आर.आर. खान म्हणाले, “समन्स बजावल्यापासून आरोपी कंगना राणौत दोनदा हजर झाली आहे, हे रेकॉर्डची बाब आहे. आरोपीला कायद्याची प्रस्थापित प्रक्रिया आणि नियम व अटींचे पालन करावे लागेल.”

“निःसंशयपणे, सेलिब्रिटी असल्याने आरोपीची व्यावसायिक कर्तव्ये आहेत परंतु ती या प्रकरणात आरोपी आहे हे विसरू शकत नाही.” असं न्यायाधीश यावेळी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ एप्रिलला होणार आहे.