दिवाळीनंतर शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरू ; कांदा बाजारभावात झाली मोठी सुधारणा, मिळाला एवढा विक्रमी भाव
Kanda Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर ही अपडेट कांदा उत्पादकांसाठी विशेष आनंदाची आहे. कारण की, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कांदा बाजार भाव सुधारणा होऊ लागली आहे.
कांद्याचे दर आता पुन्हा एकदा 6,000 रुपये प्रति क्विंटल कडे वाटचाल करू लागले आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहचले होते. विशेष म्हणजे कमाल बाजारभाव तब्बल आठ हजार रुपये प्रति क्विंटल च्या घरात पोहोचले होते.
मात्र मध्यंतरी केंद्र शासनाने कांदा निर्यात मूल्य 800 डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय घेतला आणि बफरच स्टॉक मधील दोन लाख मेट्रिक टन कांदा 25 रुपये प्रति किलो या दराने सर्वसामान्य ग्राहकांना विकण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा बाजार भावात थोडीशी घसरण झाली होती.
पण आता पुन्हा एकदा बाजारभावात सुधारणा होऊ लागली आहे. दिवाळीनंतर बाजारभावाने पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये थोडेसे समाधान आहे. खरीप हंगामातील लाल कांदा उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे.
उत्पादनात घट आली असल्याने साहजिकच शेतकऱ्यांना विक्रमी भाव मिळण्याची आशा आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आशेप्रमाणे आता बाजारभावात सुधारणा झाली असून आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये आज कांदा साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल या विक्रमी भाव पातळीवर विकला गेला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष समाधानाचे वातावरण आहे. वास्तविक, सोलापूर एपीएमसी मध्ये इतरही जिल्ह्यातील भरपूर शेतकरी कांदा विक्रीसाठी येत असतात.
अलीकडे कांदा लिलावासाठी हे मार्केट विशेष लोकप्रिय बनले आहे. या मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक नमूद केली जात आहे. आवकेच्या बाबतीत सोलापूर एपीएमसी ने गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेल्या लासलगाव एपीएमसीला देखील मोठी टक्कर दिली आहे.
याच महाराष्ट्रातील महत्वाच्या सोलापूर एपीएमसी मध्ये कांदा बाजार भावात सुधारणा झाली असल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता कुठे अच्छे दिन आले असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोलापूरमध्ये काय भाव मिळाला
आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 29,787 क्विंटल एवढी लाल कांदा आवक नमूद करण्यात आली आहे. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान शंभर, कमाल 5500 आणि सरासरी तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला आहे.
तथापि शेतकऱ्यांना बाजारभावात आणखी सुधारणा होण्याची आशा आहे. कांद्याचे बाजार भाव आणखी वाढले पाहिजेत अशी इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.