kanda bajarbhav

Kanda Bajarbhav : गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कांद्याला अतिशय कवडीमोल बाजारभाव (Onion Rate) मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधव पुरता संकटात सापडला होता. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत आहे.

ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र असे असले तरी गेल्या पाच महिन्यांमध्ये कांदा पिकासाठी झालेला खर्च पाहता सध्या मिळत असलेला बाजार भाव खूपच नगण्य असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मात्र असे असले तरी सध्या मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्च काढता येणे शक्य होणार आहे.

खरं पाहता खानदेश मध्ये महाराष्ट्र आणि विदर्भात कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सध्या कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल ते 1 हजार 600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. निश्चितच सध्या मिळत असलेल्या बाजार भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही मात्र असे असले तरी सध्या मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्च तरी भरून निघणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

मित्रांनो खरं पाहता सध्या नवीन कांदा अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात दाखल होत असलेला कांदा हा जुना कांदा असून शेतकरी बांधवांनी या कांद्याला जवळपास चार महिने साठवले आहे. अशा परिस्थितीत बराकित म्हणजेच कांदा चाळीस साठवताना शेतकरी बांधवांना कांद्यासाठी अतिरिक्त खर्च देखील करावा लागला आहे.

अशा परिस्थितीत उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात शेतकरी बांधव समाधानी नसल्याचे चित्र आहे. बराकित तसेच कांदा चाळीत साठवलेला कांदा जास्तीच्या पावसामुळे खराब झाला असून शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा आता फक्त निम्माच शिल्लक राहिला आहे.

हवामान बदलामुळे कांदा चाळीस साठवलेला कांदा सडला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असल्याने तेथील कांदा चाळीतला कांदा वाहून गेला आहे. शेतकऱ्यांच्या मते त्यांनी कांदा चाळीत तीन ट्रॅक्टर कांदा साठवला असेल तर आता त्यांना केवळ दिड ट्रॅक्टर कांदा मिळत आहे. म्हणजेच कांदा मोठ्या प्रमाणात चढला असून कांद्याच्या वजनात देखील घट झाली आहे. साहजिकच सध्या मिळत असलेला बाजार भाव शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी पुरेसा नसून यामुळे केवळ उत्पादन खर्च निघणार आहे.