kanda bajarbhav

Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो गेल्या महिन्यात कांद्याला अतिशय कवडीमोल बाजारभाव (Onion Rate) मिळत होता मात्र आता कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. खरं पाहता, सध्या बाजारात नवीन कांदा दाखल झालेला नाही, शिवाय जुना कांदा देखील आता संपुष्टात येत आहे.

अशा परिस्थितीत कांद्याचा बाजारात मोठा शॉर्टेज निर्माण झाला आहे. यामुळे बाजारात कांद्याच्या मागणीनुसार पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे बाजारात कांद्याला अधिक दर मिळत आहे. मित्रांनो आता बराकित किंवा कांदा चाळीत साठवलेला कांदा आता संपत चालला आहे.

यामुळे वाढीव दराचा खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. गेली पाच महिने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अतिशय स्वस्तात कांदा विक्री केला आहे. मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा संपत आला असताना कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. यामुळे वाढलेल्या दराचा खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

आज राज्यातील अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला 3600 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव मिळाला आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र असे असले तरी भविष्यात देखील कांद्याचा बाजारभावात अशीच वाढ कायम राहील का हा मोठा प्रश्न आहे. कारण की केंद्र सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवला आहे.

यामुळे बाजारात कांद्याचे आवक वाढण्याची शक्यता असून कांदा बाजार भाव कमी होण्याची किंवा स्थिर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो केंद्र सरकारने जवळपास 54 हजार टन कांदा राज्यांना पाठवला आहे. यामुळे कांद्याच्या किमती नियंत्रित राहणार आहेत. किरकोळ बाजारात कांदा चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होत असल्याने कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे निश्चितच कांद्याच्या किमती नियंत्रित राहणार असल्या तरी देखील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना याचा फटका बसू शकतो.

मात्र केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर देखील कांद्याच्या किमती कमी होत नसल्याने निश्चितच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते कांद्याच्या भावात आता वाढ झाली असली तरी देखील या भाव वाढीचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना होत आहे. तसेच कांदा चाळीत साठवलेला कांदा हवामान बदलामुळे सडला असून त्याचे वजन देखील कमी झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते जर त्यांनी तीन ट्रॅक्टर कांदा कांदा चाळीत साठवला असेल तर त्यांना आता फक्त दीड ट्रॅक्टर कांदा मिळत आहे.

शिवाय याचे वजन कमी झाले असल्याने शेतकरी बांधवांना निश्चितच आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. दरम्यान आज राज्यातील अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये आज कांद्याची 340 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात कांद्याला 3600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे तसेच 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा कांद्याला सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. दरम्यान कांद्याचे बाजार भाव आगामी काळात टिकतील का याबाबत स्पष्टता येणे खूपच कठीण असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.