kanda bajarbhav

Kanda Bajarbhav : सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा बाजारभावात (Onion Rate) रोजाना सुधारणा नमूद केली जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. अजूनही नवीन कांदा बाजारात दाखल होत नसल्याने आणि बराकित म्हणजेच कांदा चाळीस साठवलेला कांदा देखील आता संपत असल्याने कांद्याची आवक बाजारात कमी होत आहे.

परिणामी मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कांद्याच्या बाजारभाव सुधारणा होत आहे. दरम्यान आज देखील कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. आज राज्यात कांदा चार हजाराच्या घरात पोहोचला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. मित्रांनो आज राज्यात 1500 रुपये प्रति क्विंटल ते 2600 रुपये प्रति क्विंटल दरम्यान कांद्याला सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देत असला तरी देखील गत पाच महिने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अतिशय स्वस्तात कांदा विकला असल्याने त्यांना या वाढीव दराचा फारसा फायदा होत नसल्याचा शेतकऱ्यांचा युक्तिवाद आहे.

दरम्यान आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/10/2022
कोल्हापूर क्विंटल 5350 1000 3500 2000
सोलापूर लाल क्विंटल 17322 100 4000 1800
जळगाव लाल क्विंटल 624 452 1877 1250
पंढरपूर लाल क्विंटल 489 200 3520 1500
नागपूर लाल क्विंटल 180 1500 2500 2250
भुसावळ लाल क्विंटल 49 1500 1500 1500
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 340 1600 3600 2600
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 19 1200 2300 1750
पुणे-मोशी लोकल क्विंटल 270 400 2200 1300
जामखेड लोकल क्विंटल 110 100 3000 1550
वाई लोकल क्विंटल 20 1200 2700 1850
नागपूर पांढरा क्विंटल 100 1500 2500 2250
राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 4645 200 3000 2000
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1062 550 3200 2300