kanda bajarbhav

Kanda Bajarbhav : गेल्या महिनाभरापूर्वी कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत होता. मात्र आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा बाजार भावात मोठी सुधारणा झाली असून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना यामुळे मोठा फायदा होत आहे. मित्रांनो खरं पाहता सध्या बाजार समितीमध्ये कांद्याचा मोठा शॉर्टज निर्माण झाला आहे. यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कांदा बाजार भावात रोजाना वाढ होत आहे.

खरं पाहता अजून नवीन लाल कांदा बाजारात अपेक्षित असा पाहायला मिळत नाही. यामुळे सध्या बराकीत किंवा कांदा चाळीत साठवलेला उन्हाळी कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. शिवाय हवामान बदलामुळे तसेच गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कांदा कांदाचाळीत साठवला असल्याने कांद्याची प्रत कमालीची ढासाळली आहे. आणि कांद्याच्या वजनात देखील मोठी घट झाली आहे शिवाय कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे.

अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांदा दरवाढीचा किती फायदा मिळतोय ही निश्चितच एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे. दरम्यान आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत असून भविष्यात कांद्याच्या बाजारभावात अजून सुधारणा होईल आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील कमालीचे वाढतील अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावाविषयी सविस्तर पण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/10/2022
कोल्हापूर क्विंटल 2927 700 3100 1700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9355 2200 3000 2600
मंगळवेढा क्विंटल 46 100 2500 2150
राहता क्विंटल 1323 600 2900 2250
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 4727 1800 3330 2500
सोलापूर लाल क्विंटल 10908 100 4000 1800
जळगाव लाल क्विंटल 663 450 2185 1315
संगमनेर लाल क्विंटल 34 2000 3500 2750
भुसावळ लाल क्विंटल 11 1500 1500 1500
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 320 1500 3500 2500
पुणे लोकल क्विंटल 7786 1000 3000 2000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 19 1000 1500 1250
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 1000 1800 1400
पुणे-मोशी लोकल क्विंटल 175 400 1800 1100
संगमनेर नं. १ क्विंटल 767 2700 3011 2855
संगमनेर नं. २ क्विंटल 460 1500 2100 1800
संगमनेर नं. ३ क्विंटल 302 500 1000 750
जुन्नर उन्हाळी क्विंटल 3227 1700 3200 2500
इंदापूर उन्हाळी क्विंटल 249 100 3200 1500
पारनेर उन्हाळी क्विंटल 3850 400 3300 2150