मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या नवीन चित्रपट ‘अटॅक’मुळे चर्चेत आहे. तो सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला होता, पण यावेळी जॉनने कपिल शर्मा शोवर केलेल्या वक्तव्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

वृत्तानुसार, जॉन अब्राहमने एका मुलाखतीदरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’च्या लोकप्रियतेबद्दल सांगितले. तो म्हणाला “कपिलच्या शोमध्ये प्रमोशन केल्याने चित्रपटाची अधिक तिकिटे विकली जातील याची हमी मिळत नाही. होय, बरोबर आहे, तुम्ही ‘द काश्मीर फाइल्स’ पहा. शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले नाही, परंतु तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कामगिरी केली.”

पुढे जॉन अब्राहम म्हणाला की, “मी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला नाही, पण मी लक्ष्य राज आनंद यांना सांगितले आहे की, कोणत्याही मार्केटिंगशिवाय चित्रपट सुपरहिट होण्याचे उत्तम उदाहरण तुमच्यासमोर आहे. पण चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्य राज आनंद यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते आणि लक्ष्य मला कपिल शर्मा शोमध्ये घेऊन गेला. मलाही कपिल खूप आवडतो, तो खूप छान माणूस आहे, पण त्याच्या शोमुळे माझ्या तिकीटांची विक्री वाढत नाही.” असं जॉन यावेळी म्हणाला.