Jobs : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) अंतर्गत बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही बाह्य विद्याशाखा या पदासाठी 30 ते 60 वर्षे इतकी आहे. तर शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख या पदासाठी 28 ते 60 वर्षे इतकी आहे. दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा GEN/EWS आणि OBC उमेदवार यांच्यासाठी रु. 750/- इतका आहे. तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी रु. 150/- इतका आकारला जाणार आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 ही आहे. दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.