Jobs : बँक नोट मुद्रणालय अंतर्गत एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

बँक नोट मुद्रणालय (Bank Note Press) अंतर्गत कनिष्ठ तंत्रज्ञ या पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. दरम्यान, यासाठीअर्ज शुल्क पुढील प्रमाणे आहे –
UR/ OBC/ EWS श्रेणी – Rs.600/-
SC/ ST/ Ex-SM/ PWD श्रेणी – Rs.300/-

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीची आहे तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तर यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट bnpdewas.spmcil.com ला भेट द्यावी.

उमेदवारांनी वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
या जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यानंतर अर्जदार अर्ज करू शकतात.
इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी संबंधित पदासाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत.
आवश्यक अर्ज शुल्क/सूचना शुल्काचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आवश्यक तपशील/कागदपत्रे तयार ठेवा.
अर्ज शुल्क/सूचना शुल्काच्या ऑनलाइन पेमेंटसाठी बँक व्यवहार शुल्क (जर असेल तर) उमेदवाराला भरावे लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.