Jobs : मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत एकुण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

मध्य रेल्वे (Railway), मुंबई येथे स्पोर्ट पर्सन या रिक्त पदांची भरती होणार असून, यासाठी एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे इतकी आहे.

यासाठी अर्ज शुल्क हा अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग –या वर्गासाठी रु. 250/- इतका आकारला जाणार आहे. तर इतर सर्व उमेदवारांसाठी रु. 500/- इतका आकारला जाईल.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 ही आहे.अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
RRC/WB कार्यालयात मॅन्युअली पाठवलेला अर्ज/हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.