Jobs : मेकॉन लिमिटेड अंतर्गत एकूण 165 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

मेकॉन (MECON) लिमिटेड अंतर्गत उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियंता, वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ अधिकारी, सहायक अभियंता, कार्यकारी, सहायक कार्यकारी, उपकार्यकारी या पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
उपअभियंता – 32 ते 38 वर्षे
कनिष्ठ अभियंता – 34 वर्षे
अभियंता – 36 वर्षे
वरिष्ठ सल्लागार – 54 वर्षे
वरिष्ठ अधिकारी – 50 वर्षे
सहाय्यक अभियंता – 30 ते 34 वर्षे
कार्यकारी – 36 वर्षे
सहाय्यक कार्यकारी – 30 वर्षे
उपकार्यकारी – 32 वर्षे

यासाठीचा अर्ज शुल्क हा UR/OBC यांच्यासाठी रु. 500/- इतका आकारला जाईल तर SC/ST/PWD/माजी सैनिक श्रेणी यांच्यासाठी शुल्क नाही. यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.meconlimited.co.in ला भेट द्यावी.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीला परवानगी नाही.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.