Jobs : भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR/ MR) 01/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण 1500 पदे भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया 8 डिसेंबर 2022 पासून सुरु होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)
भारतीय नौदल (Indian Navy) अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (MR/ SSR) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी एकूण 1500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, यासाठी उमेदवाराने शिक्षण मंत्रालय, सरकारद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 8 डिसेंबर 2022 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in ला भेट द्यावी.