Jobs : शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत शिक्षक पदांच्या एकूण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, मुलाखतीची तारीख 7 ते 9 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
हे पण वाचा :- महावितरण नागपूर येथे रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित नोंदणी करा..
शिक्षण संचालनालय गोवा (Goa) येथे शिक्षक पदासाठी एकूण 88 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर नोकरीचे ठिकाण गोवा हे आहे.
दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे तर शिक्षण संचालनालय, पर्वरी, गोवा येथे मुलाखती होणार आहेत. मुलाखतीची तारीख 7 ते 9 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.education.goa.gov.in ला भेट द्यावी.
हे पण वाचा :- महापारेषण सोलापूर अंतर्गत रिक्त पदांची होणार भरती, असा करा अर्ज..
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
उमेदवारांना मुलाखतीस आपल्या सोबत त्याच्या/तिच्या अर्जाच्या पुष्ट्यर्थ आपल्या कागदपत्राच्या स्वसाक्षाकित प्रतासह मूळ दस्तऐवज जसे की, शैक्षणिक पात्रता, जन्म प्रमाणपत्र, पत्त्याचा दाखला, गोव्यातील 1 वर्षे वैध अधिवासाचे प्रमाणपत्र, वैध रोजगार विनिमय नोंदणी प्रमाणपत्र तसेच सोबत बायोडेटा आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्रे घेऊन यावीत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
अर्जदारांनी आपल्या प्राधान्याचा तालुका नमूद करावा आणि शिक्षण संचालनालय, पर्वरी – गोवा येथे सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत सकाळच्या सत्रासाठी तसेच दु.2 ते 2:30 वाजेपर्यंत सायंकाळच्या सत्रासाठी नोंदणी करावी.
सकाळी 10 नंतर आणि दु. 2:30 नंतर नोंदणीसाठी विचार केला जाणार नाही.
उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
सदर पदांकरीता मुलाखत 7 ते 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत विविध पदांची भरती सुरू, असा करा अर्ज..