Jobs : IBPS द्वारे 31 ऑक्टोबर 2022 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर IBPS SO भर्ती जाहिरात प्रकाशित केली आहे. IBPS ने या नवीन जाहिरात मध्ये विविध तज्ञ अधिकार्यांसाठी (Specialist Office) पदाच्या एकूण 710 रिक्त पद भरतीची घोषणा केली आहे. (Recruitment)
IBPS (IBPS) द्वारे I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी या रिक्त पदांसाठी एकूण 710 जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
तर यासाठीच अर्ज शुल्क हा SC/ST/PWBD साठी Rs. 175/- (inclusive of GST) इतका आहे तर for all others – Rs. 850 /- (inclusive of GST)
आहे. दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.ibps.in ला भेट द्यावी.