JioFiber Offer: जिओने (Jio) जिओ फायबर बोनांजा ऑफर सादर केली असून याचा फायदा जिओच्या ग्राहकांना होणार आहे. कंपनीने मंगळवारी नवीन डबल फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर लॉन्च केली आहे.

हा प्लान जिओ फायबरच्या नवीन ग्राहकांसाठी वैध आहे. यामध्ये तुम्हाला 100% पैसे परत देण्याचा दावा करण्यात आला आहे. याचा अर्थ तुम्ही ते विकत घेण्यासाठी खर्च केलेले पैसे तुम्हाला परत केले जातील.

जिओ फायबर डबल फेस्टिव्हल बोनान्झा

जिओने म्हटले आहे की हा (JioFiber Offer) प्लान नवीन ग्राहकांना 6,500 रुपयांचा फायदा देतो. यासाठी तुम्हाला Jio Fiber Rs 599 चा प्लान किंवा Jio Fiber Rs 899 चा प्लान निवडावा लागेल. ऑफरसाठी पात्र होण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही प्लॅनची ​​किमान सहा महिन्यांची सदस्यता खरेदी करणे आवश्यक आहे.

तुम्ही सहा महिन्यांसाठी रु. 599 प्लॅनची ​​सदस्यता घेतल्यास, तुमची एकूण किंमत रु. 4,241 असेल, ज्यामध्ये रु. 647 GST समाविष्ट आहे आणि तुम्ही रु. 899 प्लॅनचे सहा महिने खरेदी केल्यास, किंमत रु. 6,365 होईल, ज्यामध्ये GST सह रु. 971 समाविष्ट आहेत.

Jio ने दावा केला आहे की 599 रुपयांच्या प्लॅनची ​​सदस्यता घेण्यासाठी ते तुम्हाला 4,500 रुपये आणि 899 रुपयांच्या प्लॅनच्या खरेदीवर 6,500 रुपये देईल. पहिल्या ऑफरसाठी, तुमच्या फायद्यांमध्ये AJIO रु. 1,000 व्हाउचर, रिलायन्स डिजिटल रु.

1,000 व्हाउचर, NetMeds रु 1,000 व्हाउचर आणि Ixigo रु. 1,500 व्हाउचर यांचा समावेश असेल. दुसऱ्या ऑफरच्या फायद्यांमध्ये AJIO कडून रु. 2,000 व्हाउचर, रिलायन्स डिजिटलचे रु. 1,000 व्हाउचर, NetMeds चे रु 500 व्हाउचर आणि Ixigo चे रु 3,000 व्हाउचर यांचा समावेश आहे.

जिओचे इतर फायदे

याशिवाय, Jio Fiber मोफत 4K JioFiber सेट-टॉप बॉक्स देखील देत आहे, ज्याची किंमत 6,000 रुपये आहे.