Jio 5G : (Jio 5G) दसऱ्याच्या शुभ पर्वावर जिओने आपली True 5G बीटा ही सर्व्हिस सुरु केली आहे. या सार्विसद्वारे ग्राहकांना 1 GBps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. जाणून घ्या जिओच्या या सार्विसबद्दल.

रिलायन्स जिओ उद्यापासून चार शहरांमध्ये True 5G (True 5G) ची बीटा सेवा सुरू करणार आहे. या बीटा सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथून सुरू होतील. ही सेवा जगातील सर्वात प्रगत 5G (5G) सेवा असेल असे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणूनच या सेवेला True 5G असे नाव देण्यात आले आहे. Jio कडून, वापरकर्त्यांना सिम न बदलता मोफत 5G सेवा दिली जाईल आणि त्यांना जलद इंटरनेट सेवा मिळेल.

वापरकर्त्यांसाठी Jio TRUE 5G वेलकम ऑफर

1. Jio True 5G (True 5G) सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथे सुरू होईल.
2. या अंतर्गत, ग्राहकांना 1 Gbps + च्या वेगाने अमर्यादित 5G डेटा मिळेल.
3. इतर शहरांमध्ये 5G पायाभूत सुविधा तयार होताच त्या शहरांमध्येही 5G सेवा उपलब्ध होईल.
4. वापरकर्त्यांना बीटा चाचणी अंतर्गत मोफत 5G सेवा मिळेल, जोपर्यंत त्या शहरात कव्हरेज आणि वापरकर्ता अनुभव सुधारला जात नाही.
5. जिओ वेलकम ऑफर अंतर्गत, कोणत्याही ग्राहकाला जिओ सिम किंवा हँडसेट बदलण्याची गरज नाही, त्यांना आपोआप 5G सेवा मिळेल.
6. Jio 5G हँडसेटसाठी स्मार्टफोन निर्मात्यांसोबत काम करत आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना डिव्हाइसद्वारे चांगला अनुभव मिळू शकेल.

बीटा सर्व्हिस

ही बीटा चाचणी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. बीटा चाचणी हा पूर्ण लॉन्च होण्यापूर्वीचा चाचणी टप्पा आहे, ज्यामध्ये ग्राहकांचा फीडबैक घेतला जातो. मग येणाऱ्या फीडबॅकच्या आधारे गोष्टी बदलल्या जातात. जिओचे म्हणणे आहे की ते त्यांच्या 425 दशलक्ष वापरकर्त्यांना 5G सेवेचा नवीन अनुभव देऊ इच्छित आहे. याद्वारे भारतामध्ये डिजिटल परिवर्तन करायचे आहे.

4G होणार जुने

आगामी काळात 5G आर्किटेक्चर तयार करून 4G नेटवर्कवरील अवलंबित्व पूर्णपणे काढून टाकण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. याद्वारे जिओ वापरकर्त्यांना एक वेगळा अनुभव मिळेल, मग ते व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग, व्हॉईस कॉलिंग किंवा प्रोग्रामिंग असो.